गणित संबोध चाचणी (DISTRICT LEVEL)
आपले विद्यार्थी गणिताचे ज्ञान पायरी-पायरीने ग्रहण करतात. यातील एक जरी पायरी कमकुवत राहिली तरी त्यावर आधारित असलेले पुढील संबोध कळण्यात अडचणी निर्माण होतात.
संकल्पना शिडीच्या पायरी प्रमाणे एकावर एक आधारित असतात. त्यामुळे प्रत्येक इयत्तेतील संबोध ज्या त्या इयत्तेत स्पष्ट असणे आवश्यक आहे. परंतु बहुसंख्य विद्यार्थ्यांचे ज्या त्या इयत्तेतील संबोध स्पष्ट नसल्याचे दिसून आले आहे.
इयत्ता ५ वी व ८ वी मधील विद्यार्थ्यांचे गणिती संबोध दृढ व्हावेत यासाठी जिल्हा मंडळ सदरची परीक्षा जिल्हा पातळीवर आयोजित करीत असते. या संबोध चाचणीचे आयोजन २० ऑगस्ट पर्यंत प्रत्येक जिल्ह्याने करावे असे महामंडळाचे धोरण आहे.
या संबोध चाचणीच्या मार्गदर्शनासाठी महामंडळाने “गणित संबोध मार्गदर्शिका” इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी ही दोन पुस्तके मराठी व इंग्रजी माध्यमातून प्रकाशित केलेली आहेत. त्याचा लाभ महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी व शिक्षकांना झाला आहे.
गणित प्राविण्य परीक्षा (MATHEX - I LEVEL)
प्रज्ञा पूर्व तयारी म्हणून महामंडळ इथ्ता ५ वी ठ इयत्ता ८ वी च्या दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या रविवारी गणित प्राविण्य परीक्षा घेते. हि परीक्षा महाराष्ट्रभर एकाच दिवशी एकाच वेळी (दुपारी १2 ते ३ या वेळेतो घेतली जाते. या परीक्षेकरिता जिल्हा मंडळाच्या नियोजनानुसार,
- विद्यार्थी संक्येच्या प्रमाणात एक अथवा अधिक केंद्रे असतील.
- प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वेगवेगळ्या राहतील.
- प्रश्नपत्रिका महामंडळाची परीक्षा समिती व उत्तरपत्रिका जिल्हा मंडळ पुरवील.
- या परीक्षेतून प्रज्ञा स्पर्धेसाठीनिवड झलेल्या विद्यार्थ्यांची नावे जिल्हा मंडळ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संबंधीत कळठेल.
ही परीक्षा 1०० गुणांची असून वेळ तीन तास असतो. या परीच्या पर्शापात्रिकेत 1० प्रश्न असून प्रतयेक प्रश्न 1० गुणांचा असतो.
- 2 गुणांचे ७ प्रश्न,
- 3 गुणांचे 1० प्रश्न
- ४ गुणांचे ९ प्रश्न
- 5 गुणांचे ४ प्रश्न
असे एकूण असे ३० प्रश्न असतात.
या परीक्षेत विद्यार्थ्याला सुप्त गुण प्रकट करण्यास भरपूर वाढ असतो. कोणत्यही पद्धतीने (रीतीने) उदाहरणे सोडविता येतात.विचार करण्याचे व तो मांडण्याचे कौशत्य अजमावता येते. या परीक्षेसाठी उपयुक्त असणारी गणित प्राविण्य इयत्ता ५ वी गणित प्राविण्य इयत्ता ८ वी ही दोन पुस्तके महामंडळाने प्रकाशित केली आहेत.
गणित प्रज्ञा परीक्षा (MATHEX - II LEVEL)
गणित प्राविण्य परीक्षेतून प्रज्ञा स्पर्धेसाठी पात्र ठरलेले दोन्ही इयत्तांचे विद्यार्थी या स्पर्धेसाठी पात्र असतात. ही स्पर्धा फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी सर्व महाराष्ट्रातील केंद्रांवर एकाच वेळी (दुपारी १२.०० ते २.०० या वेळेत ) घेण्यात येते. प्रत्येक जिल्ह्यासाठी एकच परीक्षाकेंद्र राहील. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकच राहील.
प्रश्नपत्रिका १०० गुणांची असून वेळ दोन तास असेल. या प्रश्नपत्रिकेत ९० प्रश्न असून प्रत्येक प्रश्न ० गुणांचा असेल. प्रश्नपत्रिकेत गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल
- ३ गुणांचे ३
- ४ गुणांचे ३
- 5 गुणांचे ८
- ६ गुणांचे ३ व
- ७ गुणांचे ३
असे एकूण २० प्रश्न असतील.
प्रश्नपत्रिका हीच उत्तरपत्रिका असून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे त्यात्या प्रश्नांखाली पुरवलेत्या जागेत लिहाठयाची असतात. प्रत्येक उत्तराचे स्पष्टीकरण किंवा खुलासा अपेक्षित असतो. उत्तरपत्रिकेच्या शेवटी दोन कोरी पाने कच्च्या कामासाठी ठेवलेली असतात.